जपानमध्ये किरणोत्सर्गाचा धोका वाढला

April 12, 2011 9:48 AM0 commentsViews:

12 एप्रिल

जपानमधील अणुसंकट आणखीनच भीषण होत चाललंय. जपानमधील किरणोर्त्सगाची पातळी वाढली आणि आता ही पातळी 7 पर्यंत पोहचली आहे. हा आतापर्यंतच उच्चांक आहे. त्यामुळे आता जपानमधील परिस्थिती 1986 च्या चेर्नोबिल दुर्घटनेइतकीच गंभीर बनली आहे. रिऍक्टर्समधील प्रक्रिया अजूनही तंत्रज्ञांच्या संपूर्ण नियंत्रणात आलेल्या नाहीत. जपानमधील भूकंप आणि सुनामीला एक महिना उलटला आहे. मृतांचा आकडा 13 हजारांवर तर बेपत्ता लोकांचा आकडा 14 हजारांवर पोहचला. दरम्यान वाढता किरणोत्सर्ग लक्षात घेत जपान सरकारने फुकुशिमा दायची प्रकल्पाच्या आसपासच्या आणखी काही शहरांमधील लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.