कवडीमोल भावानं कृष्णा खोर्‍यांची जमीन बिल्डरांना दिली – खडसे

April 12, 2011 10:04 AM0 commentsViews: 5

12 एप्रिल

कृष्णा खोरे महामंडळाच्या ताब्यात असलेली 1250 एकर जमीन कवडीमोल भावानं खासगी संस्थाना तसेच बिल्डरांना दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी सोमवारी विधानसभेत केला. प्रकल्पासाठी ताब्यात घेतलेल्या शेतकर्‍यांच्या जमिनी प्रत्यक्षात प्रकल्पासाठी न वापरता, कमी किमतीत खाजगी संस्थाना देण्यात आल्या, त्यामुळे ह्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी एकनाथ खडसे यांनी केली. पण एकनाथ खडसेंनी यांनी कोणचंही नाव न घेता हा आरोप केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

close