शिर्डीत रामनवमी उत्सवाचं शतकमहोत्सवी वर्ष

April 12, 2011 11:02 AM0 commentsViews: 2

12 एप्रिल

शिर्डीत आज मंगळवारपासून राम नवमी उत्सवाला सुरुवात झाली आहेत. बाबांनी सुरू केलेल्या या उत्सवाचं हे शतकमहोत्सवी वर्ष आहे. द्वारकामाईमध्ये रामजन्मचा सोहळा साजरा झाला. दरम्यान सकाळी काकड आरती आणि मिरवणुकीने रामजन्मोत्सवाला सुरुवात झाली. उत्सवासाठी शिर्डीत 200 पालख्या दाखल झाल्या आहेत. भक्तांची गर्दी असल्याने तीन दिवस व्हीआयपी दर्शन बंद राहणार असल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त आमदार जयंत ससाणे यांनी दिली. दरम्यान मुंबईचे साईभक्त मनोज म्हात्रे यांनी बाबांना 21 लाखांचा मुकूट अर्पण केला.

close