काळाराम मंदिरात रामनामाचा जयघोषात रामजन्म सोहळा संपन्न

April 12, 2011 11:06 AM0 commentsViews: 6

12 एप्रिल

नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरात रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. वनवासाच्या काळातील प्रभु रामचंद्राच्या वास्तव्यामुळे नाशिकला वेगळी ओळख मिळाली. वाईट प्रवृत्तीचा काळ ठरलेला म्हणून तो काळाराम म्हणून प्रसिद्ध आहे. राम नवमीच्या आधी काही दिवसांपासून काळाराम मंदिरात जन्मोत्सवाचा सोहळा सुरू आहे. यात अनेक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम केले जाताहेत. आजच्या जन्मोत्सवासाठी मंदिराची विशेष सजावट करण्यात आली आहे. रामनामाच्या जयघोषात आणि पाळण्याच्या सूरांमध्ये रामजन्माचा सोहळा येथे संपन्न झाला. शेकडो रामभक्त यात सहभागी झाले होते.

close