नागपूरमध्ये राम जन्मोत्सवानिमित्त शोभायात्रा आयोजित

April 12, 2011 8:15 AM0 commentsViews: 4

12 एप्रिल

रामजन्मोत्सवानिमित्त नागपूरच्या ऐतिहासिक पोद्दारेश्वर राममंदिरात रामनवमीनिमित्त महापूजा आयोजित करण्यात आली. दुपारी बारा वाजता रामजन्म झाल्यानंतर आता विविध देखाव्यांची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यंदाच्या शोभायात्रेत सत्तरपेक्षा अधिक चित्ररथ शहराच्या विविध भागांतून जाणार आहेत. या उत्सवाचं हे पंचेचाळीसावं वर्ष आहे. दुपारी चार वाजता पोद्दारेश्वर राममंदिर शोभायात्रेची सुरवात नागपूर शहराच्या महापौर अर्चना डेहणकर आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होईल. तर संध्याकाळी सहा वाजता रामनगरमधूनही शोभायात्रा निघणार आहे.

close