मानवाच्या ऐतहासिक भरारीला 50 वर्ष पूर्ण

April 12, 2011 11:35 AM0 commentsViews: 20

12 एप्रिल

50 वर्षांपूर्वी माणसाने एक इतिहास रचला होता. 12 एप्रिल 1961 पहिल्यांदा मानवाने अंतराळात झेप घेतली. सोव्हिएत युनियनचा पायलट युरी गागारीन जगातला पहिला अंतराळवीर ठरला.

अंतराळ मोहिमांमधील चढाओढीमध्ये आघाडी घेण्यासाठी सोव्हिएत युनियनने आखली एक मोहिम – द व्होस्तोक प्रोग्राम. मानवाला अंतराळात पाठवण्याची मोहीम. यापूर्वी मानवरहित यान पाठवण्यात आणि प्राणी असलेलं अंतराळ यान पाठवण्यात रशियाला यश आलं होतं. पण अंतराळातल्या या वजनरहित अवस्थेत माणूस कसा राहू शकेल याचा मात्र अंदाज लावणं कठीण जात होतं.

युरी गागारिनचा मित्र अलेक्सी लिओनोव्ह म्हणतो की, एखाद्या माणसाला स्पेस सूट देऊन अंतराळात पाठवायचं पण तो स्पेससूटही तुमचं संरक्षण करेल की नाही याची खात्री नव्हती. या वजनरहित अवस्थेमुळे मानसिक परिणाम होतील. किंवा डोळयावर ताण येईल असंही अनेकांना वाटत होतं. पण 12 एप्रिल 1961 ला युरी गागारिनने अंतराळात झेप घेतली आणि अशा अवस्थेतही यान चालवणं किंवा संपर्क साधणं शक्य असल्याचं दाखवून दिलं.

व्हॅलेरी लुबिन्स्की म्हणतात, त्याने खरतर ते यान चालवलं नाही. लॅण्डिंग करताना लागतील तेवढेच कन्ट्रोल्स त्याच्याकडे होते. ऑटोमॅटिक यंत्रणेत बिघाड झाला तर ते कन्ट्रोल्स त्याला वापरता आले असते. या यशस्वी अंतराळमोहिमेमुळे युरी गागारिनना जगभरात प्रसिद्धी मिळली. आणि मानवाच्या अंतराळ मोहिमांना नवीन चालना मिळाली.

तर युरी गागारिनचं मत होत की, माझी मोहीम फक्त एक तास अठ्ठेचाळीस मिनिटांची होती. पण ही सुरुवात आहे. पुढे अशा अनेक मोहिमा होतील. व्होस्तोकच्या उड्डाणानंतर सातच वर्षात गागारिनचा विमान अपघातात मृत्यू त्यावेळी त्याचं वय चौतीस वर्ष होतं. पण त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्ती आणि धाडसामुळे यशस्वी झालेल्या पहिल्या मोहीमेमुळे पुढे अंतराळ मोहिमांना नवी दिशा मिळाली.

close