सोलापूर- हैदराबाद महामार्गावर अपघातात 6 जण ठार

April 12, 2011 12:12 PM0 commentsViews: 3

12 एप्रिल

सोलापूर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील बोरामणी जवळ आज भीषण अपघात झाला. आंध्रप्रदेश एसटी महामंडळाची बस आणि ट्रकमध्ये हा अपघात झाला. या अपघातात 6 जण ठार तर 9 जण जखमी झाले आहेत. जखमींना सोलापुरच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून 9 जखमींपैकी तीघांची प्रकृती गंभीर आहे. वाळू भरलेला रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रकला बसने मागून धडक दिली. या अपघातात मृत पावलेले 6 जण हे पुण्यात काम करणारे मजूर असून ते मुळचे आंध्रप्रदेशचे राहणारे होते. दरम्यान आतापर्यंत दोन मृतकांची ओळख पटलेली आहे. त्यात आशाप्पा तीनोपुराम हा 29 वर्षीय तरूण आणि कुकल्पश्री कोराकुल हा 9 वर्षीय मुलगा आहे.

close