घरात 7 महिने बंद असलेल्या बहिनींची सुटका

April 12, 2011 12:48 PM0 commentsViews: 6

12 एप्रिल

दिल्ली येथील नोएडामध्ये गेले 7 महिने घरात बंद असलेल्या दोन मुलींची पोलिसांनी सुटका केली आहे. शेजार्‍यांनी दिलेल्या माहितीनंतर पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या मुलींंची सुटका केली. या मुलींची अवस्था अतिशय वाईट होती. उपासमार आणि डिहायड्रेशनमुळे त्यांची प्रकृती खूपच खालावली आहे. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडायचा प्रयत्न केला. त्यावेळी या मुलींनी त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. नंतर पोलिसांनी घरात जाऊन एका मुलीला स्ट्रेचरवरून बाहेर आणलं. हे घर एका रिटार्यड कर्नलचे असल्याचे रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशननं सांगितलं आहे. या कर्नलचा गेल्या वर्षी मृत्यू झाला. त्याच्या मागे 2 मुली आणि एक मुलगा आहे. सध्या हा मुलगा कुठे आहे याबद्दल माहिती मिळू शकली नाही.

close