राजस्थानचा ‘रॉयल’ विजय

April 12, 2011 2:36 PM0 commentsViews: 3

12 एप्रिल

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयलनं सलग दुसर्‍या विजयाची नोंद केली आहे. तर वीरेंद्र सेहवागच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला सलग दुसर्‍या मॅचमध्ये पराभवाला सामोर जावं लागलंय. शिल्पा शेट्टीच्या राजस्थानने आज मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये रॉयल कामगिरी केली. राजस्थानने दिल्लीवर 6 विकेट राखून मात केली. पहिली बॅटिंग करणार्‍या दिल्लीने 6 विकेट गमावत 151 रन्स केले. या मॅचमध्येही दिल्लीचे प्रमुख बॅट्समन फ्लॉप ठरले. कॅप्टन वीरेंद्र सेहवाग 4 रन्स करुन आऊट झाला.

पण वॉर्नर आणि वेणुगोपाल रावने हाफसेंच्युरी करत टीमला किमान 150 रन्सचा टप्पा गाठून दिला. याला उत्तर देताना राजस्थान रॉयल्सची सुरुवातही खराब झाली. ओपनिंगला आलेला अमित पौनिकर झटपट आऊट झाला. पण यानंतर राहुल द्रविड आणि जोहान बोथाने फटकेबाजी करत राजस्थानला विजय मिळवून दिला. बंगलोरने 4 विकेटच्या मोबदल्यात विजयाचं हे आव्हान पार केलं.

पहिल्या मॅचचा हिरो ठरलेला जोहान बोथा दुसर्‍या मॅचचाही हिरो ठरला. बोथाने नॉटआऊट 39 रन्स करत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. पहिल्या मॅचमध्येही बोथानं 69 रन्स केले होते. राजस्थान रॉयल्सतर्फे राहुल द्रविडने दमदार सुरुवात केली. मिस्टर डिपेंडेबल अशी ओळख असेलला राहुल द्रविड आज धडाकेबाज भूमिकेत दिसला. पहिल्या ओव्हरपासूनच फटकेबाजी करणार्‍या द्रविडने 31 बॉलमध्ये तब्बल 6 फोर आणि 1 सिक्स मारत 38 रन्स केले.

तर दुसरीकडे आयपीएलमध्ये सलग दुसर्‍या मॅचमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सची सुरुवात खराब झाली. कॅप्टन वीरेंद्र सेहवाग पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट झाला. पण डेव्हिड वॉर्नर आणि वेणुगोपाल रावने फटकेबाजी करत टीमला किमान 150 रन्सचा टप्पा पार करुन दिला. डेव्हिड वॉर्नरने 44 बॉलमध्ये 54 रन्स केले. तर वेणुगोपाल रावने आज तुफान बॅटिंग केली. चार फोर आणि 4 सिक्स मारत त्यानं अवघ्या 40 बॉलमध्ये 60 रन्स केले. राजस्थानतर्फे कॅप्टन शेन वॉर्न कमालीचा यशस्वी ठरला. चार ओव्हरमध्ये त्यानं केवळ 17 रन्स देत 2 विकेट घेतल्या. तर शॉन टेटने 40 रन्सच्या मोबदल्यात 2 विकेट घेतल्या आहेत.

close