शरद पवारांनी घेतली पं. भीमसेन जोशींची भेट

November 9, 2008 4:10 AM0 commentsViews:

9 नोव्हेंबरभारतरत्न मिळाल्यानंतर भीमसेन जोशींना भेटणा-यांची रिघ लागली आहे. शनिवारी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि छगन भुजबळ यांनी भीमसेन जोशी यांची भेट घेतली. महाराष्ट्रातल्या मोठया व्यक्तीला हा सन्मान मिळणं ही अभिमानाची बाब असल्याचं ते म्हणाले. ' पं भीमसेन जोशी जेव्हा पुरस्कार स्वीकारायला जातील, तेव्हा त्यांची छान बडदास्त ठेवली जाईल ', असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर दिल्लीत जेव्हा येतील, तेव्हा आपल्या घरी जेवायला यायचं आग्रहाचं आमंत्रणंही शरद पवारांनी दिलं.