पोलीस आयुक्तांनी पकडली शिपायाची कॉलर !

April 12, 2011 6:13 PM0 commentsViews: 3

12 एप्रिल

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेदही आता वादात अडकले आहेत. त्यांच्यावर एका पोलीस शिपायाची कॉलर पकडल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत अहमद जावेद यांची पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी करण्यात यावी, ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचं निवेदन निवृत्त पोलीस मानव सेवा संघाच्या वतीने देण्यात आलं आहे. हे निवेदन गृहमंत्री आर. आर. पाटील तसेच राज्याच्या पोलीस महासंचालकांना देण्यात आलं आहे. तत्काळ या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात यावेत. तसेच जावेद हे यात दोषी आढल्यास त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवृत्त पोलीस मानव सेवा संघाच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे.

close