पुण्यात सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट

April 12, 2011 5:43 PM0 commentsViews: 4

12 एप्रिल

पुण्यात सोनसाखळी पळवण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून गेल्या दोन दिवसात तब्बल 12 प्रकार उघडकीस आले आहेत. विशेष म्हणजे महिलांबरोबर काही ठिकाणी पुरुषांनाही लुटण्यात आलं आहे.पुण्यातील पोलिसही या वाढत्या घटनांमुळे त्रस्त झाले आहेत. फिरायला, देवदर्शनला जाणार्‍या महिला तसेच मोटरसायकलवरुन जाणार्‍या महिलाही सोनसाखळी चोरट्यांचे लक्ष्य बनल्याने महिला वर्गात भीतीचे वातावरण आहे. या घटनांनतर पोलिसांनी नाकाबंदीची नव्याने आखणी करण्याबरोबर वाहतूक पोलिसांचही सहाय्य घेण्याचं ठरवलंय. शिवाय नागरिकांनीही वैयक्तिक खबरदारी घेण्याचे आवाहन केलंय.

close