न्यायालयीन चौकशी समितीकडून आदर्शची पाहणी

April 13, 2011 9:40 AM0 commentsViews: 3

13 एप्रिल

वादग्रस्त आदर्श सोसायटीची न्यायालयीन चौकशी सुरू झाली आहेत. न्यायमूर्ती जे ए पाटील आणि माजी मुख्य सचिव पी सुब्रमण्यम आदर्श परिसरात दाखल झाले आहेत. ते आदर्श सोसायटीची पाहणी करत आहे. आदर्श सोसायटीच्या सोसायटीची पाहणी करतांना एकुण 11 विभागाच्या प्रतिनिधींना आयोगाचे अध्यक्ष जे ए पाटील यांनी बोलावले.

यात मुख्य सचिवांचे प्रतिनिधी, एमएमआरडीएचे आयुक्त, महानगरपालिकेचे आयुक्त, आर्किटेक्टची टीम, आदर्श सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिव, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव, महसूल आणि वनविभागाचे प्रधान सचिव, संरक्षण खात्याचे सचिव, केंद्रीय विधी आणि न्याय खात्याच्या मंत्र्यांचे सचिव, राज्याच्या विधी आणि न्याय खात्याच्या मंत्र्यांचे सचिव, मुंबईचे जिल्हाधिकारी यांना बोलावण्यात आलंय.

केंद्रीय पर्यावरण खात्याची आदर्श पाडण्याची नोटीसीची मुदत उद्या संपत आहे. तत्पूर्वी आज बुधवारी आदर्श सोसायटीने नोटीसीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये केंद्रीय पर्यावरण खात्याच्या नोटीसीला मुदतवाढ दिली गेली नाही अथवा स्थगिती दिली गेली नाही तर आदर्शची इमारत पाडण्यावाचून राज्यसरकारसमोर पर्याय राहणार नाही.

ही भूमिका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्याच आठवड्यात विधानसभेत मांडली. त्यामुळे आदर्शवरील हायकोर्टातील आजच्या सुनावणीकडे सगळ्याचे लक्ष लागलं आहे. आदर्श सोसायटीत कन्हैयालाल गिडवानी यांचे सहा फ्लॅट असल्याचे आयकर विभागाच्या कागदपत्रावरुन उघड झाले आहे. कन्हैयालाल गिडवानी यांच्या नावे एक मुलाच्या नावे 2 तर 3 फ्लॅट बेनामी असल्याचेही आयकर विभागाच्या सूत्रांकडून सांगितलं जातंय.

close