पाक सरकार आणि आयएसआयनंच रचला होता 26/11चा कट !

April 12, 2011 6:02 PM0 commentsViews: 2

12 एप्रिल

मुंबई हल्ल्यासाठी पाकिस्तान सरकार आणि आयएसआयच जबाबदार आहेत असा दावा लष्कर-ए-तोयबाचे अतिरेकी डेव्हिड हेडली आणि तहाव्वुर राणा यांनी केला आहे. हे दोघेही सध्या अमेरिकेतल्या तुरुंगात आहेत. त्यांच्या खटल्याची सुनावणी येत्या 16 मे रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोर्टात सादर झालेल्या काही कागदपत्रांचा तपशील द ग्लोब आणि मेल या वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केली आहे. त्यात 26/11 चा हल्ला पाकिस्तान सरकार आणि आयएसआयच्या आदेशावरून झाला आहे. लष्कर-ए-तोयबाचा त्यात संबंध नसल्याचे राणा याने सांगितल्याचं या वृत्तपत्रांनी म्हटलं आहे.

close