सगळे बंधन झुगारत मंदिराच्या गाभार्‍यात महिलांचा प्रवेश

April 13, 2011 9:49 AM0 commentsViews: 1

13 एप्रिल

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात आज बुधवारी अखेर महिलांनी प्रवेश केला. सगळे बंधन झुगारत भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मंदिराच्या गाभार्‍यात धडक दिली. गेल्या काही दिवसांपासासून हा मुद्दा गाजत होता. महिलांना गाभार्‍यात प्रवेश देण्याची मागणी जोर धरत होती.अखेर त्यावर आज महिलांनी आपल्या स्टायलनी तोडगा काढत गाभार्‍यात प्रवेश केला.

महालक्ष्मी मंदिरात स्त्रियांना पूजा आणि अभिषेक करण्यासाठी गाभार्‍यात यायला बंदी आहे. ही बंदी उठवण्यात यावी अशी मागणी महिलांनी केली आहे. तर अंनिसचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर यांनीही या बंदीला विरोध केला आहे. राज्य सरकारने पुढाकार घेऊन ही बंदी उठवावी असं आव्हानं त्यांनी केलं आहे. स्त्रियांना मंदिराच्या गाभार्‍यात जाऊन अभिषेक करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी मनसेचे, आमदार राम कदम यांनी सोमवारी सभागृहात केली होती.

close