पुन्हा भारत-पाक भिडणार ?

April 13, 2011 3:23 PM0 commentsViews: 3

13 एप्रिल

भारत आणि पाकिस्तान दरम्यान यंदाच्या वर्षात तीन वन डे मॅचची सीरिज होण्याची शक्यता आहे. त्यासाठी दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांची मोर्चबांधणी सुरू आहे. मोहालीत वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने आले होते. या मॅचमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि पाकिस्तानही मैदानावर तो खिलाडूवत्तीने स्वीकारला.

या मॅचला पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी उपस्थित होते. त्यांनी त्याचवेळी दोन्ही देशात क्रिकेट सीरिज सुरु करण्याबाबत सुचना केली होती. आणि त्यानंतरच दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डानी यासाठी बोलणी सुरू केली आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख सुभान अहमद यांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे. ही वन डे सीरिज केव्हा आणि कुठे होणार याबाबत मात्र अजून निर्णय घेण्यात आलेला नाही. गेल्या दोन वर्षात दोन्ही टीममध्ये केवळ दोन वनडे मॅच झाल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेतली चॅम्पियन ट्रॉफी आणि नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये या दोन्ही टीम आमने सामने आल्या होत्या.

close