सातार्‍यात प्रेमी युगुलांची आत्महत्या

April 13, 2011 3:53 PM0 commentsViews: 4

13 एप्रिल

सातार्‍यातील चारभिंत परिसरात एका विवाहित प्रेमी युगुलाने आत्महत्या केली. विषारी किटकनाशक घेऊन या जोडप्याने आपली जीवनयात्रा संपवली. ते दोघेही पुण्यातील असून ते डेक्कन पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते. रविंद्र गायकवाड आणि मोनिका रासकर अशी या प्रेमी युगलाची नावे आहेत. उंच डोंगरावर हा चारभिंत असल्यामुळे या भागात लोक फिरायला येतात. रात्रीच्या सुमारास या दोघांनी आत्महत्या केली. आणि सकाळी 10 वाजता फिरायला आलेल्या लोकांना मृतदेह आढळला. मृत्यूचं कारण अजून स्पष्ट होवू शकलेलं नाही. पोस्टमार्टमसाठी या दोघांचे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.

close