स्वातंत्र सैनिक उधमसिंग यांच्या नातवाला लोकमतची पाच लाखांची मदत

April 13, 2011 4:20 PM0 commentsViews: 61

13 एप्रिल

जालियानवाला बाग हत्याकांडाचा सुत्रधार जनरल डायरला गोळ्या घालून ठार करणारे स्वातंत्र सैनिक शहीद – ए- आजम उधमसिंग यांच्या नातवाचा लोकमतकडून दिल्लीत सन्मान करण्यात आला. लोकमत वृत्तपत्र समुहाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी हलाखीचे जीवन जगणारे उधमसिंग यांचे नातू जीतसिंग यांना पाच लाख रुपयाचा मदतनिधीही दिला.

जीतसिंग पंजाबमधील एका खाजगी कंपनीत रोजंदारी करुन उदरनिर्वाह चालवत असल्याचे कळल्यावर त्यांना मदत देण्याचे खासदार विजय दर्डा यांनी ठरवले. इतिहासाच्या पानांमध्ये हरवलेले स्वातंत्रसैनिक तसेच संगीत कला क्षेत्रातील महान विभूतींच्या कुंटुबीयांचा जीवनस्तर सुधारण्याची मोहिम 'लोकमत ' वृत्तपत्राद्वारे राबवण्यात येत आहे.

close