मुख्यमंत्र्यांचा विधानपरिषदेवर जाण्याचा मार्ग मोकळा

April 13, 2011 4:35 PM0 commentsViews: 1

13 एप्रिल

मुख्यमंत्र्यांचा विधान परिषदेच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला आहे. हायकोर्टाने निवडणूक आयोगाला अधिसूचना काढण्याची परवानगी दिली आहे. 11 मे पूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आमदार होणं बंधनकारक आहे. पण निवडणूक आयोगाकडून मात्र विधानपरिषद निवडणूकीची अधिसूचना केली नव्हती. ही अधिसूचना काढण्यापूर्वी मुंबई हायकोर्टाची परवानगी घेणं निवडणूक आयोगाला आवश्यक वाटलं. त्यामुळे आयोगाने हायकोर्टात धाव घेतली होती. ही अधिसूचना काढण्यासाठी आता हायकोर्टाने परवानगी दिल्याने काँग्रेसही निश्चित झालंय.

close