‘क्रिकेटच्या गीता’ मध्ये सचिन सर्वोत्तम

April 13, 2011 5:38 PM0 commentsViews: 2

13 एप्रिल

सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहेत. क्रिकेटची गीता मानली जाणार्‍या विस्डेननं 2010 या वर्षातला जगातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून सचिन तेंडुलकरची निवड केली आहे. 2010 च्या हंगामात सचिनने टेस्टमध्ये 78 च्या सरासरीने 1500 रन्स केले होते. आणि त्यात तब्बल सात सेंच्युरीचा समावेश होता. इतकेच नव्हे तर वन डेत 200 रन्स करणारा सचिन जगातील एकमेव बॅटसमन ठरला होता. आणि टेस्टमध्ये सेंच्युरीची हाफ सेंच्युरी ठोकत याच वर्षात सचिनने अनोखा वर्ल्ड रेकॉर्डही केला होता. विस्डेन तर्फे गेल्या 85 वर्षात पहिल्यांदाच वर्षातील पाच उत्कृष्ट खेळाडूंएवेजी चार खेळाडूंची निवड करण्यात आली. कारण पाचवा खेळाडू पाकिस्तानचा होता. आणि स्पॉट फिक्सिंगमध्ये तो दोषी आढळल्यामुळे त्याचं नाव वगळण्यात आलंय. यामध्ये मॉर्गन, ख्रिस रिड, जोनाथन ट्रॉट आणि तमिम इक्बालचा समावेश आहे. तमिम हा विस्डेनमध्ये स्थान पटकावणारा 122 वर्षातील बांगलादेशचा पहिला खेळाडू आहे.

close