बीड बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड

April 13, 2011 5:06 PM0 commentsViews: 5

13 एप्रिल

बीड बलात्कार प्रकरणातला मुख्य आरोपी बाबुलाल रसाळला माजलगाव पोलिसांनी अटक केली. गेवराई तालुक्यातील अडगाव इथं त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, पीडित मुलीची प्रकृती अजुनही गंभीर आहे. आपल्याकडचं काम सोडल्याचा राग मानून बाबुलालनं शेतमजुराच्या अल्पवयीन मुलीवर आठ दिवस बलात्कार केला. रसाळ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असून तो सुरमापुरी गावाचा माजी उपसरपंच आहे. त्याचा भाऊ सरपंच आहे.

close