महाराष्ट्रात आता महिलाराज; महिला आरक्षण विधेयक मंजूर

April 14, 2011 9:26 AM0 commentsViews: 20

14 एप्रिल

राज्याच्या महिला धोरणातील अत्यंत महत्त्वाचे पाऊल सरकारने बुधवारी 13 एप्रिलला टाकलं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्याचे विधेयक महाराष्ट्र विधानसभेनं बुधवारी मंजूर केलं. या पुढच्या राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परीषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांमध्ये हे पन्नास टक्क्यांचे महिला आरक्षण लागू होणार आहे. विधानसभेनं हे विधेयक एकमताने मंजूर केलंय. याबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हे राज्याच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल असल्याचं म्हटलंय. तर, विधानसभेतल्या महिला आमदारांनीही आनंद व्यक्त केला.

close