महालक्ष्मी मंदिरात मनसेच्या महिलांनी केला गाभार्‍यात प्रवेश

April 14, 2011 9:57 AM0 commentsViews: 6

14 एप्रिल

मनसेचे आमदार राम कदम यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी आज कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश केला. मंदिरातील पुजार्‍यांनी नरमाईची भुमिका घेत आमदार राम कदम यांना मोजक्या महिलांना घेवून यावं त्याचबरोबर आपणही सोवळं नेसून मंदिर गाभार्‍यात प्रवेश करावा असं अवाहन केलं. त्याला प्रतिसाद देत राम कदम यांनी सोवळं नेसून महिलांना घेऊन गाभार्‍यात प्रवेश केला. यावेळी महिलांनी देवीला साडी नेसवून ओटी भरली. दरम्यान, मनसेच्या महिलांनी देवीची ओटी भरल्यानंतर आनंद उत्सव साजरा केला. आमदार राम कदम यांनी मंदिर परिसरात लाडू वाटले. त्याचबरोबर मंदिर विकासाठी सरकारने 500 कोटी रुपये द्यावेत अशी मागणीही राम कदम यांनी केली.

close