नाशकात भूमीहीन आंदोलनातील सत्याग्रहींचा सत्कार

April 14, 2011 11:39 AM0 commentsViews: 1

14 एप्रिल

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी नाशिक काँग्रेसतर्फे एक आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नाशिकला झालेल्या भूमीहीन आंदोलनातल्या सत्याग्रहींचे यावेळी सत्कार करण्यात आले. काँग्रेसतर्फे जाहीर करण्यात आलेल्या सामाजिक समता वर्षा निमित्ताने हा कार्यक्रम घेण्यात आला. आंबेडकरांना पाहाण्याची, ऐकण्याची संधी लाभलेल्या रुपाताई साळवे, गायकवाड यांच्यासोबत सत्याग्रहात सहभागी झालेल्या नानूबाई गांगुर्डे, बळवंत पाटील, बाबाजी वाघमारे, काशीनाथ गायकवाड यांना गौरवण्यात आलं. बाबासाहेबांच्या विचारांनी दिलेली ताकद सत्काराथीर्ंनी गाण्यातून मांडली.

close