महामानवाला भावपूर्ण आदरांजली

April 14, 2011 10:25 AM0 commentsViews: 8

14 एप्रिल

दलितांचे कैवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 120 व्या जयंती निमित्त देशभरात बाबांना भावपूर्ण आदरांजली वाहिली जात आहे. ज्या समाजाला गावाच्या वेशीबाहेर जगण आणि गावाबाहेरचं मरण अशा समाजाला डॉ.बाबासाहेबांनी समाजात माणूसकीने जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. मंदिरात प्रवेश असो अथवा गावाच्या विहीरीवर पाणी पिणं यासाठी क्षुद्र म्हणून हिणवणार्‍या समाजातील प्रवृत्ती विरूध्द बाबांनी लढा देऊन दलित समाजाला न्याय मिळवून दिला आणि दलित समाजात ताठ मानेनं जगण्याचा अधिकार दिला. बाबासाहेबांनी देशाची राज्य घटना लिहून अखंड भारताला एका छता खाली आणलं. अशा या महामानवाची आज 120 वी जयंती या निमित्त आयबीएन लोकमत परिवाराच्या वतीने त्रिवार वंदना.

close