ज्ञानेश्वरांच्या जीवनावर नृत्य-नाट्य

November 9, 2008 9:24 AM0 commentsViews: 12

9 नोव्हेंबर, पिंपरी-चिंचवडसागर शिंदेज्ञानेश्वरांच्या जीवनावर आजपर्यंत अनेक चित्रपट आणि नाटकं सादर झाली आहेत. मात्र पहिल्यांदाच ज्ञानेश्वरांचं चरित्र आणि तत्वज्ञान सांगणार अमृत संजीवनी हे नृत्यनाट्य रंगमंचावर साकारण्यात आलं आहे.अमृत संजीवनी हे ज्ञानेश्वरांच्या जीवनावर आधारित दोन अंकी नृत्यनाट्य आहे. ज्ञानेश्वरांच्या अभंगावर आधारित नृत्यरचना आणि ज्ञानेश्वरांचा जीवनपट उलगडणारे नाट्यपूर्ण प्रसंग यांचा एकत्रित वापर करण्यात आला आहे. याचा पहीलाच प्रयोग पिंपरी चिंचवड शहरात सादर झाला. ' असं म्हटलं जातं की तरूण पिढी संत साहित्याचा अभ्यास करत नाही मात्र या नृत्यनाट्यात सोळा वर्षाच्या नंदी बाळा सोबत चाळीस ते पंचेचाळीस वर्षांपर्यंतचे सर्व कलाकार आहेत ' असं या नृत्य-नाट्याच्या कोरिओग्राफर मीनल कुलकर्णी यांनी सांगितलं.ज्ञानेश्वरांचे दर्शन अधिकाअधिक सुस्पष्ट करण्याचा या नृत्यनाट्यातल्या कलाकारांचा प्रयत्न आहे. त्यात लहानमोठे असे चाळीस कलाकार रंगमंचावर आपली कला सादर करतात. ज्ञानेश्वरांच्या जीवनावर आधारित या पहिल्याच नृत्यनाट्याला पिंपरी चिंचवड शहरातल्या रसिकांनीही चांगला प्रतिसाद दिला.

close