डॉ.बाबासाहेबांनी शाहु महाराजांना लिहिलेले अप्रकाशित पत्र प्रकाशित

April 14, 2011 2:52 PM0 commentsViews: 100

14 एप्रिल

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांचं अप्रकाशित पत्र कोल्हापूरचे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी प्रकाशात आणली आहेत. छत्रपती शाहु महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधील पत्रव्यवहाराचा यामध्ये समावेश आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढाकाराने अखिल भारतीय बहिष्कृत समाजाची पहिली परिषद 1920 मध्ये भरविण्यात आली होती. या परिषदेचं अध्यक्षस्थान राजर्षी शाहु महाराजांनी स्विकारावे यासाठी बाबासाहेबांनी शाहु महाराजांना स्वत:च्या हस्ताक्षरात पत्र लिहीलं होतं. त्याचबरोबर या पत्राला शाहु महाराजांनी उत्तर दिलं होतं. ही दोन्ही पत्रं इंद्रजित सावंत यांनी आपल्या संशोधनातून प्रकाशात आणली आहेत.

close