पुण्यात खाजगी शिक्षणसंस्थांना 75 टक्के कर सवलतीचा निर्णय

April 14, 2011 4:44 PM0 commentsViews: 1

14 एप्रिल

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरांनी एक महत्वाकांक्षी निर्णय घेतला, शहरातील दर्जेदार खाजगी शिक्षण संस्थांकडून घेतल्या जाणार्‍या सर्वसाधरण करामध्ये तब्बल 75 टक्के सवलत देण्याचा हा निर्णय आहे. अर्थात ह्या सवलत घेण्यार्‍या सस्थांना काही अटी घालून घालण्यात आल्या आहेत. या निर्णयाचे संस्थाचालकांनी आणि पालकांनी स्वागत केलंय. ह्या सवलतीचा फायदा घेणार्‍या संस्थांना डोनेशन घेता येणार नाही. शिवाय 10 गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावं लागणार आहे. या संस्थांचा वार्षिक निकाल किमान 85 टक्के असला पाहिजे अशा अटी घालण्यात आल्या आहेत.

close