भारतीय ऑटो मार्केटमध्ये बूम

April 14, 2011 4:57 PM0 commentsViews: 3

14 एप्रिल

2010- 11 या चालू आर्थिक वर्षात भारतीय ऑटो मार्केटमध्ये गाड्यांची विक्री वाढली आहे. वर्षभरात अनेक ऑटो कंपन्यांनी विविध गाड्या बाजारात आणल्यात. त्यामुळे गाड्या खरेदी करण्यासाठी अनेक कार शौकीन पुढे सरसावले आहेत. यात ग्रामीण भागातील लोकांचा वाटा मोठा आहे. 2010-11 या चालू आर्थिक वर्षांत गाड्यांची विक्री ही 29 टक्क्यांनी वाढली आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्यूफॅक्चरर्स (सियाम) या संघटनेने यावर्षात 18 टक्के वाढ होईल असा अंदाज वर्तवला होता. मात्र ऑटो सेक्टरमध्ये अचानक आलेल्या बूममुळे आंनंदाचे वातावरण आहे. या वर्षात 155 कोटी गाड्या विकल्या आहेत.

close