इथिओपियाच्या देरिबा मेर्गाने जिंकली दिल्ली मॅरेथॉन

November 9, 2008 9:33 AM0 commentsViews: 4

9 नोव्हेंबर दिल्ली ,दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दिल्ली मॅरेथॉनवर इथिओपिया आणि केनियाच्या स्पर्धकांच वर्चस्व होतं. इथिओपियाच्या देरिबा मेर्गाने 21 किलो मीटरचं अंतर 59 मिनिटं आणि चार सेकंदाच्या विक्रमी वेळेत पूर्ण करत ही स्पर्धा जिंकली. केनियाच्या विल्सन किपसांगने त्याला कडवी झुंज दिली. किपसांग मेर्गाच्या मागोमाग होता. आणि त्याने 59 मिनिटं आणि पंधरा सेंकदात शर्यत पूर्ण करत दुसरा क्रमांक पटकावला. केनियाचाच विल्सन छाबेड तिसरा आला. त्यापूर्वी, मोठ्या उत्साहात मॅरेथॉनला सुरुवात झाली. जवळ जवळ पंचवीस हजार अ‍ॅथलीट्सनी स्पर्धेत भाग घेतला. पहिली स्पर्धा पार पडली ती सिनिअर सिटिझनची. त्यानंतर सुरू झालेल्या मुख्य मॅरेथॉनला अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांनी फ्लॅग ऑफ केलं. व्हील चेअर इव्हेंटमध्ये यंदा 51 स्पर्धकांनी भाग घेतला. आणि सगळ्यात शेवटी सुरू झाली द ग्रेट दिल्ली रन स्पर्धा. या स्पर्धेसाठी जवळ जवळ पंधरा हजार लोकांनी आपलं नाव नोंदवलं होतं. सगळ्या स्पर्धा विजय मार्गावरच्या सेंट्रल सर्व्हिसेस स्पोर्ट्स ग्राऊंडपासून सुरू झाल्या. मॅरेथॉन दरम्यान 800 पोलीस आणि 250 सुरक्षा रक्षक जागोजागी तैनात करण्यात आले होते.

close