डेक्कन ‘चार्ज’ बंगलोरवर 33 धावाने मात

April 14, 2011 6:20 PM0 commentsViews:

14 एप्रिल

सलग दोन पराभवानंतर डेक्कन चार्जर्सने आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली आहे. त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 33 रन्सनं पराभव केला. भरत चिपलीनं केलेल्या हाफसेंच्युरीच्या जोरावर पहिली बॅटिंग करणार्‍या डेक्कन चार्जर्सने 5 विकेट गमावत 175 रन्स केले. याला उत्तर देताना रॉयल बंगलोरला 9 विकेट गमावत 142 रन्स करता आले. विराट कोहलीने विजयासाठी अखेरपर्यंत केलेली झुंज व्यर्थ ठरली. कोहलीने 71 रन्स केले. पण त्याला इतर बॅट्समनची साथ मिळाली नाही. बंगलोरच्या प्रमुख बॅट्समन सपशेल फ्लॉप ठरले. बंगलोरचे तब्बल तीन बॅट्समन शुन्यावर आऊट झाले. यात त्यांचा हुकमी एक्का एबी डिव्हिलिअर्सचाही समावेश होता. तीन मॅचमधील बंगलेरचा हा दुसरा पराभव ठरला.

close