मोदींची पंतप्रधानांवर पुन्हा टीका

April 14, 2011 6:34 PM0 commentsViews: 2

14 एप्रिल

पंतप्रधानांनी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानन केल्याने मोदींना टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. पंतप्रधान आसाममधून राज्यसभेवर निवडून आलेत. त्यामुळे त्यांचं आणि त्यांच्या पत्नी गुरशरन कौर यांचं नाव आसाममधील्या दिसपूर मतदारसंघात नोंदवण्यात आलंय. इथं काल विधानसभा निवडणुकांसाठी मतदान झालं. पण पंतप्रधांन मात्र मतदानाला गैरहजर होते. याचं कारण काय असा सवाल नरेंद्र मोदींनी सिंग यांना विचारला. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसने म्हटलंय की पंतप्रधानांनी आसामच्या विकासासाठी मोठं काम केलं आहे. त्याचा विरोधकांनी विचार करावा. मोदींनी विधायक मुद्द्यांचे राजकारण करावे असंही काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी म्हणाले.

close