अखेर महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात महिलांना प्रवेश

April 15, 2011 9:43 AM0 commentsViews: 2

15 एप्रिल

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिर गाभार्‍यात महिलांना आता प्रवेश करता येणार आहे. एवढंच नाही तर आता महिलांना अभिषेकही करता येणार आहे. या संदर्भात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी देवस्थानचे पुजारी, देवस्थान समिती आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत एक बैठक घेतली .या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सगळ्यात आधी याचिका दाखल केली होती. त्यानंतर मनसे आमदार राम कदम यांनी विधानसभा सभागृहात ही मागणी केली. बुधवारी भाजपच्या महिला आघाडीने धडक प्रवेश करत बंदी मोडून काढली, तर काल राम कदमांच्या नेतृत्त्वाखाली मनसे महिला आघाडीने मंदिर गाभार्‍यात धडक प्रवेश केला होता.

close