जैतापूर प्रकल्पाबाबत पुनर्विचाराची गरज नाही – जयराम रमेश

April 15, 2011 6:09 PM0 commentsViews: 1

15 एप्रिल

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा पुनर्विचार करण्याची गरज नसल्याचे केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे जैतापूर प्रकल्पाबाबत गेल्या काही दिवसात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. जैतापूर प्रकल्पाला गेल्या 28 नोव्हेंबरला पर्यावरणाची मंजुरी देण्यात आली. त्यामुळे प्रकल्पाचा पुनर्विचार करण्याची गरज नाही अणुऊर्जा देशाची गरज आहे, असंही रमेश यांनी म्हटलं आहे. पण सागरी किनार्‍यावरच्या प्रकल्पांच्या सुरक्षेचे निकष काटेकोरपणे पाळले जावेत याची दक्षता घ्यावी लागेल. तसेच गरज पडल्यास जैतापूरवर पर्यावरण संवर्धनाच्या अधिकच्या अटी लादल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलंय. फुकुशिमा इथली दुर्घटना आमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. त्यापासून खूप काही शिकण्यासारख आहे असंही ते म्हणाले आहेत.

close