चारकोप मानखुर्द मेट्रोला ग्रीन सिग्नल

April 15, 2011 11:20 AM0 commentsViews: 15

15 एप्रिल

मुंबईत सागरी किनारा मार्गाला राज्य सरकारच्या आराखड्याला पर्यावरण मंत्रालयाने परवानगी नाकारली आहे. पण या प्रस्तावात काही सुधारणा करण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाची उच्चस्तरीय समिती नेमून नवीन नियोजन करणार असल्याचे पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी सांगितलं आहे. सागरी मार्गांना परवानगी नाकारली असली तरी पर्यावरणमंत्र्यांनी मुंबईकरांना थोडासा दिलासाही दिला आहे. चारकोप-वांद्रे-मानखुर्द मेट्रोच्या टप्प्याला पर्यावरण मंत्रायलाने ग्रीन सिग्नल दिला आहे. 32 किलोमीटरचा हा मार्ग असणार आहे.

मुंबईतल्या वरळी ते नरीमन पॉईंट आणि बांद्रा ते वर्सोवा या सागरी किनारा मार्गाचा आराखडा पर्यावरण मंत्रालयाने जरी नाकारला असला तरी वरळी ते हाजी अली सागरी सेतूच होणार आणि हाजी अली ते नरीमन पॉईंट सागरी किनारा मार्गाच्या आराखडाचा उच्चस्तरीय अभ्यासगटामार्फत विचार करू असं केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी आज स्पष्ट केलं.

हा मार्ग मुंबईच्या या भागातून जाणार आहे.

-चारकोप-मालाड-कस्तुरी पार्क-बांगुर नगर-ओशिवरा-समर्थ नगर-शास्त्री नगर-डी.एन.रोड-एसिक नगर-जेव्हीपीडी-जुहू-विलेपार्ले-नानावट हॉस्पिटल-आर्य समाज चौक-खार-नॅशनल कॉलेज-वांद्रे-एमएमआरडीए-इन्कमटॅक्सावट ऑफिस-भारत नगर-कुर्ला-स.गो.बर्वे मार्ग-शिवाजी चौक-मानखुर्द

close