भिवंडीजवळ पाईपलाईनचं काम सुरू ; 30 टक्के पाणी कपात

April 15, 2011 9:52 AM0 commentsViews: 2

15 एप्रिल

मुंबईमध्ये काल गुरूवारी भिवंडीजवळ मुंबईला पाणीपुवठा कऱणारी पाईपलाईन फुटली. त्यामुळे आज शहरात तीस टक्के पाणीकपात करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपुन वापरण्याच आवाहन महापालिकेनं केलं आहे. काल मध्यरात्रीपासून मुंबई पालिकेचे 70 ते 80 कामगार आणि अधिकारी पाईपलाईन दुरुस्तीचं काम करत आहे. पूर्व आणि पश्चिम भागात दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाईपलाईन फुटल्यामुळे दुरुस्तीच्या कामात थोडा उशीर होतोय. दरम्यान टेमगर भागातील पाईपलाईनचा वॉल्व ओपन केल्यामुळे अजूनही हजारो लिटर पाणी वाया जात आहे. संध्याकाळपर्यंत पाईपलाईन दुरस्त होण्याची शक्यता आहे.

close