कबड्डी -कबड्डी आता मॅटवर

April 15, 2011 11:56 AM0 commentsViews: 37

15 एप्रिल

एरव्ही लाल मातीवर खेळली जाणारी कबड्डी आता मॅटवर खेळली जात आहे. नेहमी कबड्डीचा वर्ल्डकप मॅटवर खेळवला जातो. आणि म्हणूनचं स्थानिक कबड्डीपटूंनाही मॅटचा सराव व्हावा म्हणून वरळी कोळीवाडा येथे मॅटवरील भव्य व्यावसायिक कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेसाठी जमिनापासून 3 फुट उंच फ्लॅटफॉर्म उभारण्यात आला आहे.

गोल्फादेवी येथील श्री गजानन फ्रेंडस् सर्कलने या आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन केलं आहे. श्री संकल्प प्रतिष्ठानच्या संगीता आहीर यांच्या पुढाकाराने कबड्डीला हा नवा लुक देण्यात आला आहे. मुंबईतील 12 व्यावसायिक टीम्स या स्पर्धेत सहभागी झाल्याआहेत. स्पर्धेचे उद्घाटन ग्राम विकास मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सचिन आहीर उपस्थित होत.

close