मुंबई आणि कोची येणार आमने सामने

April 15, 2011 9:58 AM0 commentsViews: 2

15 एप्रिल

आयपीएलमध्ये शुक्रवारी दुसरी मॅच होणार आहे मुंबई इंडियन्स आणि कोची टस्कर्स केरला या दोन टीममदरम्यान. राजस्थान रॉयलप्रमाणेच मुंबई इंडियन्सनंही सलग दोन मॅचमध्ये विजय मिळवला. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या मुंबई इंडियन्सची टीम यंदाच्या हंगामातली सर्वात भक्कम टीम मानली जातेय.

कोची टस्कर्सची टीम मात्र विजयाच्या शोधात आहे. याआधीच्या दोन्ही मॅचमध्ये कोचीला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आणि आता मुंबई इंडियन्सविरुध्दची मॅचही कोचीसाठी सोपी नसणार आहे. त्यातच ही मॅच मुंबईच्या वानखेडे मैदानावर होत असल्याने मुंबईला घरच्या प्रेक्षकांचाही पाठिंबा मिळणार आहे.

राजस्थानचा मुकाबला नाईट रायडर्सशी

राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये शुक्रवारी मुकाबला रंगणार आहे. शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या राजस्थानने स्पर्धेतील याधीच्या दोन्ही मॅच जिंकल्यात आणि टीम आता विजयाच्या हॅट्‌ट्रीकसाठी सज्ज झाली आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सची टीम कामगिरीही उंचावली आहे. पहिल्या पराभवानंतर नाईट रायडर्सने दुसर्‍या मॅचमध्ये डेक्कन चार्जर्सचा तब्बल 9 विकेटने पराभव केला होता.

close