रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये वाळू उपशावरची बंदी उठवली

April 15, 2011 12:52 PM0 commentsViews: 10

15 एप्रिल

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू उपशावरची दोन वर्षांची बंदी उठवण्याचा निर्णय केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी जाहीर केला. सीआरझेड बाहेरची वाळू उपसाबंदी पूर्ण शिथिल करण्यात आली आहे. तर सीआरझेड परिसरातल्या वाळू उपशाबाबत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड नियमांप्रमाणे परवानगी देईल. असं जयराम रमेश यांनी स्पष्ट केलंय. रमेश यांनी राज्य सरकारच्या विनंतीला मान देऊन वाळू उपशाला बंदी उठवल्याचं जाहीर केलं.

close