सचिनला भारतरत्न देण्यासाठी पवारांची बॅटिंग !

April 15, 2011 1:23 PM0 commentsViews: 2

15 एप्रिल

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला भारतरत्न सन्मान मिळाला पाहिजे ही मागणी अनेक स्तरातून होत आहे. आता आयसीसीचे अध्यक्ष शरद यांनीही खुद्द ही मागणी केली आहे. सचिनला भारतरत्न मिळवून देण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन राज्य सरकारकडे शिफारस करणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. शरद पवार हे एमसीएचे अध्यक्षही आहेत. भारतरत्न मिळण्याएवढी सचिनची योग्यता नक्कीच आहे त्यामुळे त्याला भारतरत्न मिळायलाच हवा असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

close