बाळासाहेब विखे पाटलांनी घेतली अण्णांची भेट

April 15, 2011 2:27 PM0 commentsViews: 27

15 एप्रिल

ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी राळेगणसिध्दीमध्ये जाऊन अण्णा हजारेंची भेट घेतली. दिल्लीतील यशस्वी आंदोलनानंतर राळेगणमध्ये परतलेलेल्या अण्णांचं हार फुलं शाल देऊन विखेंनी स्वागत केलं. आयबीएन लोकमतशी बोलताना विखे पाटलांनी अण्णांना आपला पाठिंबा आहे असं सांगितलं. तसेच लोकपाल बिलला राजकारण्यांचा विरोध हा या विधेयकतातील त्रुटींमुळं असल्याचं स्पष्ट केलं. या भेटीनंतर विखे पाटील आणि अण्णा यांनी अर्धा तास चर्चाही केली.

close