नाईट रायडर्सचा दुसरा दणकेबाज विजय

April 15, 2011 2:37 PM0 commentsViews:

15 एप्रिल

आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं सलग दुसरा शानदार विजय मिळवला आहे. गौतम गंभीर आणि जॅक कॅलिसच्या दमदार बॅटिंगच्या जोरावर नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा 9 विकेट आणि 9 बॉल राखून पराभव केला. घरच्या मैदानावर खेळणार्‍या राजस्थानने विजयासाठी नाईट रायडर्ससमोर 160 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. याला उत्तर देताना कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात खराब झाली.

मनविंदर बिस्ला झटपट आऊट झाला. पण यानंतर राजस्थानच्या बॉलर्सना एकही विकेट घेता आली नाही. शेन वॉर्नच्या स्पिनची जादूही आज कमाल करु शकली नाही. ऑलराऊंडर जॅक कॅलिस आणि कॅप्टन गौतम गंभीरने राजस्थानच्या बॉलर्सची चांगलीच धुलाई केली. या जोडीने दुसर्‍या विकेटसाठी 152 रन्सची नॉटआऊट पार्टनरशिप करत नाईट रायडर्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. गौतम गंभीर 75 तर जॅक कॅलिस 80 रन्सवर नॉटआऊट राहिले. कोलकाता नाईट रायडर्सचा हा दुसरा विजय ठरला आहे. तर राजस्थान रॉयल्सचा सलग दोन विजयानंतर पहिला पराभव ठरला आहे.

close