गांगुलीसाठी कोचीनं लावली पुन्हा फिल्डिंग

April 15, 2011 10:50 AM0 commentsViews:

15 एप्रिल

सौरव गांगुलीसाठी आयपीएलचे दरवाजे पुन्हा एकदा उघडण्याची शक्यता आहे. कोची टीमचा ऑलराऊंडर स्टिव्ह स्मिथच्या पायाचा घोटा दुखावल्यामुळे उर्वरित स्पर्धेत तो खेळू शकणार नाही. त्यामुळे कोची टीम त्याच्यासाठी बदली खेळाडू शोधत आहे. यापूर्वी गांगुलीला करारबद्ध करायला ही टीम उत्सुक होती. त्यामुळे स्मिथऐवजी आता गांगुलीला टीममध्ये घेण्यासाठी टीमने प्रयत्न चालवला आहे असं बोललं जातंय.

बदली खेळाडू घेण्यासाठी आयपीएलचे काही नियम आहेत. आणि या नियमात गांगुलीची निवड बसते का हे अजून कळलं नाही. पण सौरव गांगुली आयपीएलमध्ये न खेळता सुद्धा कायम चर्चेत आहे एवढं नक्की.

close