पुण्यात रस्त्यांच्या अर्धवट कामाविरोधात मनसेचं आंदोलन

April 15, 2011 3:10 PM0 commentsViews: 1

15 एप्रिल

पुण्यातील डहाणूकर कॉलनी परिसरातील चौकात होत असलेल्या भुयारी मार्गाचे काम हे 6 महीन्यांपासून रखडलं आहे. तसेच कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांची कामही अर्धवट अवस्थेत असल्याने मनसेतर्फे आंदोलन करण्यात आलं. कोथरूड परिसरातील डहाणूकर कॉलनीचा परिसर गजबजलेला असतो. वाहतुकीची वर्दळही इथं मोठ्या प्रमाणावर असते. मनसेनं महापालिकेच्या दिरंगाईचा निषेध केला आहे. तसेच लवकर काम पूर्ण केलं नाही तर महापालिकेत आंदोलनाचा इशारा दिला आहे. या परिसरातल्या नागरिकांनीही अर्धवट कामाबद्दल चीड व्यक्त केली आहे.

close