यवतमाळमध्ये भरदिवसा तरूणीवर चाकूने हल्ला

April 15, 2011 4:28 PM0 commentsViews: 1

15 एप्रिल

यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी येथे भरदिवसा एका महाविद्यालयीन तरुणीवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तरूणी गंभीर जखमी झाली. धक्कादायक बाब म्हणजे भरदिवसा महाविद्यालयीन परिसरातच या तरुणीवर चाकू हल्ला करण्यात आला. पोलिसांनी आरोपी गणेश राठोड या मारेकर्‍याला अटक केली. जखमी मुलीवर यवतमाळच्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सकाळी महाविद्यालयात निघालेल्या तरुणीशी आरोपीची बाचाबाची झाली. याचा राग मनात धरून आरोपींने तिच्यावर चाकूनं वार केला. यावेळी इथं उपस्थित असलेल्या इतर विद्यार्थ्यांनी तरुणीची सुटका केली आणि मारेकर्‍याला पोलिसांच्या हवाली केलं.

close