कोकण मराठी संमेलनाचं उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

April 15, 2011 4:40 PM0 commentsViews: 4

15 एप्रिल

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या तेराव्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचा आज शुभारंभ झाला. यंदा हे संमेलन रायगड जिल्ह्यातील रोहा येथे भरलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं. स्वागताध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी संपूर्ण रोह्यात फिरली. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. आदिवासी नृत्यं, घागर, फुगड्या, तलवारबाजी, लेझीम या खेळांची प्रात्यक्षिक ही मिरवणुकीत लक्ष वेधून घेत होती.सुमारे 500 हून अधिक साहित्यिक या संमेलनात सहभागी झाले होती. 17 तारखेपर्यंत हे संमेलन सुरु राहणार आहे.

close