पुण्यात शिवसेनेच्या महिला आघाडीचं साखळी आंदोलन

April 15, 2011 4:45 PM0 commentsViews: 2

15 एप्रिल

पुण्यात आज शुक्रवारी शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे महिलांचा स्वच्छतागृह आणि सुरक्षिततेचा प्रश्न सोडवला जावा यासाठी पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आलं. महिला कार्यकर्त्यांनी मानवी साखळीद्वारे महापालिकेला गराडा घातला होता. पुण्यामध्ये पुरूषांसाठी एकूण 500 स्वच्छतागृह बांधण्यात आली आहेत. तर महिलांसाठी फक्त 180 स्वच्छतागृह आहेत. त्यामुळे महिलांसाठीची स्वच्छतागृह वाढवण्यात यावीत यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. तसेच गेल्या काही दिवसामध्ये मंगळसूत्र आणि साखळी चोरांचा धुमाकुळ सुरू आहे.हा प्रश्न सोडवून महिला सुरक्षितता वाढवावी अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली.

close