एर्नाकुलम एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा

November 9, 2008 10:22 AM0 commentsViews: 6

9 नोव्हेंबर पनवेल ,पनवेल येथून सुटणा-या एर्नाकुलम एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची माहीती देणारा एक फोन रात्री रेल्वे कंट्रोल रूमला आला. बॉम्बच्या फोनमुळे रेल्वे पोलिसांनी तात्काळ सर्व रेल्वेची तपासणी सुरू केली. घटनास्थळी ताबोडतोब बॉम्ब शोधक पथकही पोहचलं. परंतु कोणत्याही प्रकारची स्पोटक पदार्थ त्याठिकाणी नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यावेळेस प्रवाशांचीही कसून चौकशी करण्यात आली. दोन तासाच्या या घटनेनंतर एर्नाकुलम एक्सप्रेसला हिरवा कंदील दिला.

close