महालक्ष्मी मंदिरात महिलांना गाभारा प्रवेशाला आजपासून अंमलबजावणी

April 16, 2011 3:59 PM0 commentsViews: 14

16 एप्रिल

कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिरात महिलांना गाभारा प्रवेश निर्णयाची आजपासून अंमलबजावणी होत आहे. काल शुक्रवारी या संदर्भात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी देवस्थानचे पुजारी, देवस्थान समिती आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत एक बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कोल्हापुरात महिलांनी फटाके वाजवून आणि पेढे वाटून जल्लोष केला. आजपासून हा निर्णय अमलात आणण्यात येणार आहे. आज मनसे आमदार राम कदम यांनी मंदिर गाभार्‍यात जाऊन सपत्नीक अभिषेक केला.

महालक्ष्मी मंदिर गाभार्‍यात महिलांना आता प्रवेश करता येणार आहे. एवढंच नाही तर यामुळे आता महिलांना महालक्ष्मीचा अभिषेकही करता येणार आहे. आजपासून या निर्णयाची अंबलबजावणी करण्यात येणार आहे. यासंदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं सगळ्यात आधी याचिका दाखल केली होती. त्यानंतर मनसे आमदार राम कदम यांनी विधानसभा सभागृहात ही मागणी केली. बुधवारी भाजपच्या महिला आघाडीने धडक प्रवेश करत बंदी मोडून काढली. तर राम कदमांच्या नेतृत्त्वाखाली मनसे महिला आघाडीने मंदिर गाभार्‍यात धडक प्रवेश केला होता.

close