जगाला हसवणार चार्लीचा आज वाढदिवस

April 16, 2011 11:37 AM0 commentsViews: 9

16 एप्रिल

हसवत हसवत आपल्या डोळ्यात पाणी आणणार्‍या चार्ली चाप्लिन या महान अभिनेत्याचा आज 122 वा जन्मदिवस आहे. 16 एप्रिल 1889 मध्ये चार्ली चाप्लिनचा जन्म झाला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत चार्लीनं आपलं बालपण काढलं. पुढे अनेक सिनेमांतून कोट्या करत चार्लीनं जगभरात सगळ्यांना हसवलं. परंतु त्याच्या स्वत:च्या आयुष्याला दु:खाची झालर होती. मुक चित्रपटाचा काळ त्यानं गाजवला. फिल्म डिरेक्टर म्हणून उत्कृष्ट अभिनेता म्हणून आणि संगीत संयोजक म्हणून त्यानं द ग्रेट डिक्टेटर, द ट्राम्प, आणि द किड सारखे दर्जेदार हास्यपट दिले.

close